R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति उत्तर भारतीयांना ओबीसीत आरक्षणाला भाजपचा विरोध? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की,

उत्तर भारतीयांना ओबीसीत आरक्षणाला भाजपचा विरोध? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की,

 

नागपूर | काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी उत्तर भारतीयांना ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यावर माराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी मोठं विधान केलं आहे. महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा राजकीय स्टंट केला जात आहे, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

बावनकुळे म्हणाले की, मुंबईसह ठाणे महापालिकेच्या निवडणुका डोळ्सासमोर ठेवून काँग्रेसने उत्तर भारतीयांना ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मताच्या राजकारणासाठीची ही मागणी करण्यात आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून काँग्रेसने कधीच अशी मागणी केली नव्हती. मग आताच ही मागणी का करण्यात आली? हा निवडणुकीचा स्टंट आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.

तसेच केंद्र सरकारने राज्याला आरक्षणाचे अधिकार दिले आहेत. आता राज्य सरकारने निर्णय घ्यावा. आधीच मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला आहे. एकीकडे जे आरक्षण होतं ते संपत चाललं आहे. दुसरीकडे मतांसाठी ही मागणी केली जात आहे. ओबीसी आरक्षणाच्या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलेला सल्ला अंमलात आणावा. दोन्ही बैठकीत फडणवीस यांनी जे मुद्दे मांडले त्याची सरकार अंमलबजावणी का करत नाही?, असा सवालही त्यांनी केला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“मी शिवसेनेत होतो तेव्हा ते खासदार सुद्धा नव्हते, भुजबळांनी लगावला टोला

  नाशिक | नाशिक येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला होता....

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments