R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति भाजपच्या महिला आमदाराने पक्षाला दिला घरचा आहेर, भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नाही...

भाजपच्या महिला आमदाराने पक्षाला दिला घरचा आहेर, भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नाही सन्मान

नवी मुंबई | भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षाला घरचा आहेर देत गंभीर आरोप लगावले आहेत. मंदा म्हात्रे यांनी भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. मंदा म्हात्रे यांनी ही खंत थेट महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यापुढेच बोलून दाखवली आहे. यावेळी मंदा म्हात्रे यांनी दोनदा विधानसभेवर निवडून आल्यानंतरही पक्षाकडून डावलले जात असल्याचा आरोप केला आहे.

त्या म्हणाल्या की, आपण २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष लढण्याचे संकेत पक्षाला दिले होते, असे देखील यावेळी मंदा म्हात्रे म्हणाल्या. त्याचप्रमाणे, स्वतःच्या कामावर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्याचा दावा देखील मंदा म्हात्रे यांनी केला आहे. विधानसभेवर दोनदा निवडून आल्यानंतर, कर्तृत्व सिद्ध करून दाखवून सुद्धा पक्षाकडून डावलले जात असल्याचे म्हणत मंदा म्हात्रे यांनी यशोमती ठाकूर यांच्यासमोर आपली पक्षावरील नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे त्या म्हणाल्या कि, कोणालाही मी घाबरत नाही. मला कोणाला घाबरायची गरज नाही. मी नेहमी स्पष्टच बोलते. मला तिकीट द्या किंवा नका देऊ. मी लढणार म्हणजे लढणार. इतर पक्ष असतात ना आपल्याला साथ द्यायला. महिलांना राजकारणात यश मिळू लागल्यानंतर स्वपक्षातील नेत्यांकडूनच महिला नेत्यानेच पंख छाटले जातात, अशी खंतसुद्धा मंदा म्हात्रे यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. पण, आपण कधीही स्वतःला कमी समजू नये, असा सल्ला देखील यावेळी मंदा म्हात्रे यांनी दिला आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments