R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशाहीर करंडक स्पर्धेचे आयोजन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशाहीर करंडक स्पर्धेचे आयोजन

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात शिवशाहीर करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अंतिम सोहोळ्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी मनसे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे, माजी नगरसेविका रुपाली पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “दुपारचे दोन वाजले आहेत. सकाळ पासून ही वक्तृत्व स्पर्धा सुरू आहे.त्यामुळे अनेकांच्या पोटात बहुदा वक्तृत्व वक्तृत्व असे आवाज येत असतील. पण आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त शहरातील स्थानिक नेत्यांनी स्पर्धा घेण्याचे ठरविले. त्याचा कार्यक्रम होत आहे.

बाबासाहेब म्हटल्यानंतर शिवराय ही गोष्ट आलीच, त्या पार्श्वभूमीवर शिवराय यांच्यावर दोन विषय घेऊन, वक्तृत्व स्पर्धा घेतली गेली आहे. त्यामुळे वक्तृत्व स्पर्धेतून वक्ते तयार होणे आज महत्वाची गोष्ट आहे. आता मी चार-पाच जणांची भाषणे ऐकली. त्या सर्वांचा मला हेवाच वाटतो. मी माझ्या शालेय जीवनात कधी वक्तृत्व स्पर्धेत कधी भागच नाही घेतला. भीती वाटायची, बोलायला भीती वाटायची. लोकांसमोर जायच कसं, बोलायाचे कसे आणि जे बोलू शकतात त्यांच्याबद्दल मला नेहमी कुतहूल वाटायचे.” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, “मी आजवर वक्ते ऐकले आहेत. घरात तर माननीय बाळासाहेब होतेच, तसेच मी श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नाडिस, अटलबिहारी वाजपेयीजी असे अनेक वक्ते मी जवळून पाहिले आणि ऐकले देखील आहेत. पण हे लहानपणापासून बघत असताना. मी कधीतरी बोलेल, असं मला कधीच वाटलं नव्हते.” असे महंत यांनी यावेळी जुना किस्सा सांगितला होता.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments