R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home देश देशातील टॉप १० शाळांमध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांचा समावेश व्हावा - आदित्य ठाकरे

देशातील टॉप १० शाळांमध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांचा समावेश व्हावा – आदित्य ठाकरे

 

बृहन्मुंबई महापालिका, शिक्षक, विविध स्वयंसेवी संस्था आदी सर्वांच्या सहभागातून महापालिका शाळांची मोठ्या प्रमाणात दर्जोन्नती आणि गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे. या शाळांमधील गळतीही कमी झाली असून आता प्रवेशासाठी मागणी वाढली आहे. येत्या काळात देशातील टॉप १० शाळांमध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या कमीतकमी ५ शाळांचा समावेश व्हावा यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

अक्षर फाउंडेशन आणि महापालिकेमार्फत शिक्षकांच्या प्रशिक्षणाची मोठी मोहीम राबविण्यात आली. यात सहभागी शिक्षकांना शनिवारी ऑनलाईन पद्धतीने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी पालकमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी महापालिका शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सहआयुक्त अजित कुंभार, शिक्षणाधिकारी राजू तडवी, पेहले अक्षर फाउंडेशनच्या संस्थापिका राधा गोयंका, प्रकल्प प्रमुख परिता शाह यांच्यासह प्रशिक्षणात सहभागी शिक्षक ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, काही वर्षापूर्वी महापालिका शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची गळती आता थांबत आहे. या शाळांची गुणवत्ता वाढ, शिक्षकांची प्रशिक्षणे, शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आल्याच्या परिणामस्वरुप महापालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी मागणी वाढली आहे. २०१३ मध्ये आपण व्हर्चुअल क्लासरुमची संकल्पना महापालिका शाळांमध्ये प्रत्यक्षात आणली. क्वॉलिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या सहभागातून या शाळांच्या दर्जोन्नतीसाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात आल्या.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

” देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये.” केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे.

  राज्यातील वीज उत्पादन संकटास केन्द्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन करण्यात येत असलेल्या आरोपात अजिबात सत्यता नाही. केन्द्र सरकारने राज्य सरकारला पावसाळा...

केंद्रात मंत्री असूनही नारायण राणे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान नाही

  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून आपली नवी टीम जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, माजी...

“लाठ्या-काठ्या उचला. आक्रमक शेतकऱ्यांना तुम्हीही त्याच भाषेत उत्तर द्या” मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांचे वादग्रस्त विधान

  केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दीड वर्षांपासून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. अशातच आता आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments