R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'फक्त राजकीय दुकान चालवण्यासाठी राजू शेट्टींचं आंदोलन'

‘फक्त राजकीय दुकान चालवण्यासाठी राजू शेट्टींचं आंदोलन’

 

सांगली | राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. काही तांत्रिक त्रुटीमुळे राजू शेट्टींची आमदारकी इतर कुणालातरी जाण्याची शक्यता आहे. याविरोधात राजू शेट्टींनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यावर आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जहरी टीका केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणावर म्हटले, ‘राजू शेट्टींच्या आमदारकीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय. पण, मला वाटतं की त्यांचा भ्रमनिराश तेव्हा झाला होता, जेव्हा मला मंत्रीपद मिळालं होतं. आता त्यांचा पुन्हा भ्रमनिराश झालेला दिसतोय. त्यांनी आता काशीपर्यंत आत्मक्लेष यात्रा काढावी, अशा बोचरी टीका सदाभाऊ यांनी केली’.

तसेच ‘राजू शेट्टींचं आंदोलन म्हणजे राजकीय दुकान चालवण्यासाठी आहे. या सरकारकडून भ्रमनिरास झाला असेल तर राजू शेट्टींनी बाहेर पडावं’, असे आव्हान सदाभाऊ यांनी दिले आहे. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसनं राजू शेट्टींचं नाव वगळल्याची चर्चा आहे. त्यावरून राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

Recent Comments