R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री होणे नाही, राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांने केले तोंडभरून कौतुक

उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री होणे नाही, राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांने केले तोंडभरून कौतुक

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांनी जोरदार टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारवर केली होती. मात्र कोरोनाच्या संकटात सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. कोविड संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती कोणालाच जमली नसती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री होणे नाही, अशा शब्दांत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कामाचे कौतुक केले.

शिवसेनेच्या शाखांमधून ज्या पद्धतीने गोरगरीबांची कामे केली जातात तशाच प्रकारचे काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही करावे, असे आवाहन आव्हाड यांनी केले. डोंबिवली पूर्वेत रविवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. त्या वेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या पद्धतीचा संदर्भ देत काम कसे करायचे हे सांगितले. ते म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुका लवकरच लागतील. त्यामुळे जनतेपर्यंत जायला पाहिजे म्हणून भिवंडीला गेलो होतो

डोंबिवलीत आलो आहे. कल्याण तालुक्यात खरी पक्षाची वाट गणेश नाईक यांनी लावली. त्यांनी रणनीती आखत पक्ष पोखरला. त्यानंतर जी गळती झाली त्यातून आपण अजून सावरलो नाही. गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या विधानाबाबत प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे अख्तर जे काही बोलले याबाबत आश्चर्य वाटत नाही.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

इंधन दरवाढीवर आंदोलन करणारा भाजप आता गप्प का ?

  मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आज बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली असताना त्यात दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य व्यक्ती हतबल झाला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments