R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आम्हाला उद्ध्वस्त करून राज्य करायचे असेल तर खुशाल आमच्या मुडद्यावर बसून करा...

आम्हाला उद्ध्वस्त करून राज्य करायचे असेल तर खुशाल आमच्या मुडद्यावर बसून करा – राजू शेट्टी

 

कोल्हापूर | सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटेनचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये शीतयुद्ध पेटलेले दिसून येत आहे. त्यातच राज्यपाल नियुक्तीच्या वादावरून शेट्टी आणि राष्ट्रवादीमध्ये वाद होत असल्याचे चित्र पेटलेले असताना पिकांना नसणारा भाव, बाजारपेठेतील हमीभाव, ऊसाची एफआरपी, कृषी कायदे या विविध मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहे तर दुसरीकडे राज्य सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलं आहे.

ते पुढे म्हणाले की, आघाडी सरकारला सत्याग्रहाच्या मार्गानेच गुडघे टेकायला भाग पाडून पूरग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी मरण पत्करू, पण कोणालाही शरण येणार नाही, अशी गर्जना स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पूरग्रस्तांच्या आक्राेश पदयात्रेच्या सांगता सभेत केले. आम्हाला उद्ध्वस्त करून राज्य करायचे असेल तर खुशाल आमच्या मुडद्यावर बसून करा, असे आव्हानही दिले. केंद्र सरकारच्या सापत्नभावामुळेच पूरग्रस्तांची होरपळ होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शेट्टी म्हणाले की, जीवनदायी नद्या आता आमच्या मुळावर उठल्या आहेत, यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. पाण्याचा प्रवाहाचा अभ्यास न करता ठेकेदारांच्या सोईसाठी केलेल्या पुलांच्या व रस्त्यांच्या भरावाचा फटका आम्हाला बसत आहे. आंबोली ते महाबळेश्वरचे सर्व पाणी नृसिंहवाडीत येते. पुरातून कायमस्वरुपी सुटका होण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments