R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "मध्यप्रदेशात माधवरावांच्या सुपुत्रांना काँग्रेसपासून फोडलं. ते राजकारण. दुसरं कोणी केलं असतं तर...

“मध्यप्रदेशात माधवरावांच्या सुपुत्रांना काँग्रेसपासून फोडलं. ते राजकारण. दुसरं कोणी केलं असतं तर खंजीर खुपसला”

 

मुंबई | राज्यात खंजीर खुसपणं या वादावरून आता खासदार संजय राऊत आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात वाद सुरु झाले आहे. खंजीर खुसपणं या शब्दावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवारांना घेऊन त्यांनी सरकार बनवलं ते राजकारण. इतरांनी केलं असतं तर खंजीर खुपसला?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. राजकारणात कोणी साधूसंत असतं का? तुमचं आज राज्यात सरकार नसेल. पण आमचं तीन पक्षाचं सरकार आहे ना, तरीही तुम्हाला तुमचं सरकार यावसं वाटतं. याला काय म्हणतात? हे राजकारण आहे, असं सांगतानाच दुसऱ्याने केलं तर पाठीत खंजीर खुपसला.

तुम्ही भल्या पहाटे अजित पवारांना घेऊन सरकार बनवलं ते राजकारण. दुसरं कोणी केलं असतं तर पाठीत खंजीर खुपसला. राजकारणात देशभरात अशा गोष्टी सुरू असतात. मध्यप्रदेशात माधवरावांच्या सुपुत्रांना काँग्रेसपासून फोडलं. ते राजकारण. दुसरं कोणी केलं असतं तर खंजीर खुपसला. हे शब्द आता राजकारणात कोणी वापरू नयेत. वापरले जाऊ नयेत. राजकारण गेल्या काही वर्षापासून याच पद्धतीने सुरू आहे. याला पारदर्शक राजकारण म्हणत नाही, असं राऊत म्हणाले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments