R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नारायण राणेंना अटक केली जाते तर मग संजय राऊतांना का नाही?

नारायण राणेंना अटक केली जाते तर मग संजय राऊतांना का नाही?

 

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर त्यांना अटक करण्यात आली होती तर दुसरीकडे आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा जुन्नर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विरोधकांना टोला मारताना वादग्रस्त विधान करून नवा वाद अंगावर ओढवून घेतला आहे. आम्ही समोरुन कोथळा बाहेर काढतो असं वक्तव्य राऊत यांनी जाही सभेत केलं होतं. याच वक्तव्यावरून भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला असून संजय राऊत यांना पुण्यात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे. तसेच भाजपकडून त्यांच्या अटकेची मागणी देखील करण्यात आली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत हे मागील दोन दिवस पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिरूर, खेड, जुन्नरमध्ये शिवसेनेच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं होतं तसेच भाजपवर देखील जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. काल खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधला होता. आता भाजपने देखील राऊतांना गर्भित इशारा दिला आहे.

भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना पुण्यात फिरू देणार नाही, असा इशाराही दिला आहे. तसेच कोथळा बाहेर काढू हे त्यांचं वक्तव्य एकप्रकारे धमकीच दिल्यासारखी आहे. ती आम्ही खपवून घेणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अटक झाली होती. त्यामुळे आता राऊत यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक करावी. जर गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर राज्यभरात आंदोलन करण्यात येईल असेही मुळीक यावेळी म्हणाले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

Recent Comments