R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या धनंजय मुंडेने कितीही बचाव केला, तरी नियती त्याला सोडणार नाही

धनंजय मुंडेने कितीही बचाव केला, तरी नियती त्याला सोडणार नाही

 

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांना एट्रोसिटी प्रकरणी कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच त्यांच्या गाडीत रविवारी पिस्तुल आढळल्याने परळी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईही केली आहे. तथापि, धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फसवायचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला.

वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेणार, पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगणार आहे, असे दोन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक लाइव्ह करत सांगितले होते. त्यानुसार वैजनाथ मंदिरात आल्यानंतर करुणा शर्मा यांची गाडी अडवून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. या नंतर पोलिसांनी त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले. तिथे त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये पिस्तुल आढळली.

दरम्यान, भाजपचे नेते निलेश राणे यांनी याबाबतचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचे दिसत आहे. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडावेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

‘करुणा मुंडेची गाडी उघडून त्यात एक व्यक्ती काहीतरी ठेवतांना स्पष्ट दिसत आहे. काय चाललंय महाराष्ट्रात? न्याय मागायला आलेल्या महिलेला ही वागणूक मिळते, चुकीच्या केसमध्ये अटक करण्यात येते. मंत्री मुंडे ने कितीही स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला तरी एक दिवस त्याला नियती सोडणार नाही’ या शब्दात निलेश राणे यांनी ट्विट करत करुणा यांच्या मदतीला धाव घेतल्याचे दिसून येत आहे.

 

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्थररोड जेलमध्ये शाहरुखनंतर ‘ही’ व्यक्ती पोहचली आर्यनच्या भेटीला

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी शाहरुख त्याला जेलमध्ये भेटायला गेला होता. आता बातम्या येत...

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments