R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नारायण राणे यांच्या गाडीवर चालक म्हणून ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यू

नारायण राणे यांच्या गाडीवर चालक म्हणून ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यू

उत्तरप्रदेश | केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मागच्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. त्यात महाराष्ट्रात झालेली अटक आणि त्यानंतर करण्यात आलेली सुटका त्यामुळे ते संपूर्ण देशभरात चर्चेत होते, त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गाडीचालकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना घडली आहे.

अशोक कुमार वर्मा असं मृत्यू झालेल्या चालकाचं नाव आहे. अशोक कुमार वर्मा हे उत्तर प्रदेशातील राज्य स्थावर विभागात चालक म्हणून कार्यरत होते. नारायण राणे लखनौच्या दौऱ्यावर असताना अशोक कुमार यांची नारायण राणे यांच्या गाडीवर ड्यूटी लावण्यात आली होती.ड्यूटीवर असताना अशोक कुमार यांना ह्रदयविकासाचा झटका आला. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचपर्यंत त्यांच्या मृत्यू झाला. अशोक कुमार वर्मा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.

‘अशोक कुमार यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे त्यांनी वैद्यकीय रजा घेतलेली होती. पण, केंद्रीय मंत्री (नारायण राणे) दौऱ्यावर आल्यानंतर वैद्यकीय रजेवर असतानाही त्यांना बळजबरीने ड्यूटीवर बोलावून घेण्यात आलं’, असा आरोप कुटुंबीय व नातेवाईकांनी केला आहे.कुटुंबीयांनी स्थावर विभागाचे प्रमुख अमरिश श्रीवास्तव यांच्यावर आरोप केले आहेत. ‘अशोक कुमार वर्मा यांच्या आजाराविषयी श्रीवास्तव यांना माहिती होती. मात्र, तरीही त्यांनी फोन करून बोलावून घेतलं. फोनवर त्यांनी निलंबित करण्याची धमकी दिली. ज्यामुळे अशोक कुमार वर्मा यांना ड्यूटीवर जावं लागलं’, असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments