R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति KDMC अधिकारी आणि बिल्डर यांच्यात झालेल्या बैठकीचे CCTV फुटेज वायरल

KDMC अधिकारी आणि बिल्डर यांच्यात झालेल्या बैठकीचे CCTV फुटेज वायरल

 

कल्याण | कल्याण-डोंबिवली महानगर पालिका अधिकाऱ्यांवर यापूर्वी अनेकवेळा खंडणी आणि लाज घेत असल्याचे अनेकअरोप करण्यात आले होते. त्यातच आता असाच एक व्हिडिओ एका बिल्डरने वायरल केल्यामुळे एकचखळबळ उडाली आहे. कल्याण पूर्व भागातील दावडी परिसरात डीपी रस्त्यात येणाऱ्या सहा मजली बेकायदा इमारतीवर केडीएमसीने नुकतीच कारवाई केली होती.

मात्र या इमारतीचा बिल्डर मुन्ना सिंग याने केडीएमसी प्रशासनावर गंभीर आरोप करत कारवाई न करण्यासाठी अधिका-यांनी वारंवार पैसे उकळल्याचा गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान एका हॉटेलमध्ये बिल्डर सिंग यांच्यासोबत केडीएमसी अधिकारी दीपक शिंदे, उपायुक्त अनंत कदम यांची बैठक झाली. या बैठकीचा सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे .

तसेच बिल्डरच्या आरोपाची केडीएमसी आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. सिंग यांनी केलेल्या आरोपात किती तथ्य आहे हे चौकशीअंती समजेलच. परंतु केडीएमसीचे अधिकारी एका हॉटेलमध्ये बसून बेकायदा बांधकाम करणा-या एका बिल्डर सोबत सुमारे सव्वा तास काय चर्चा करत होते? असा सवाल निर्माण झाला आहे.

केडीएमसी अधिकाऱ्यांनी कारवाई न करण्यासाठी लाखो रुपये घेतले मात्र पैसे घेतल्यानंतर देखील इमारत पाडल्याचा आरोप एका बिल्डरने केला आहे. इतकंच नाही तर पालिकेचे अधिकारी आणि संबंधित बिल्डरसोबत एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.तर या प्रकरणाची चौकशी करुन दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आश्वासन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

निवडणूकीला जो बायडन घेऊन या; संजय राऊतांचा भाजपला टोला

  दादरा नगर हवेलीत होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कंबर कसली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. या पोट निवडणुकीच्या निमित्ताने अनेक...

“प्रशांत किशोरांनी पक्षात प्रवेश करावा मग ज्ञान पाजळावे” काँग्रेसच्या या नेत्याचा सल्ला

  नवी दिल्ली | राजकारणातील चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर सध्या चांगलेच चर्चेत आलेले दिसून येत आहे. किशोर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत अद्याप काही माहिती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments