R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राज ठाकरेंनी हायकोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करावा, राष्ट्र्वादीने दिला सल्ला

राज ठाकरेंनी हायकोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करावा, राष्ट्र्वादीने दिला सल्ला

 

मुंबई | मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये विविध मुद्द्यावरून वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी भाष्य करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. राज्य सरकारचा मनपावर प्रशासक नेमून स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा घाट आहे अशी टीका त्यांनी केली होती, आता या टीकेला प्रवक्ते नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्या ठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट सरकार आखत आहे असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला होता. याला आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाच्या आदेशांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे.

राज्य सरकार कोणत्याही प्रकारे निवडणुका पुढे ढकलून त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याच्या विचारात नाही. कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. याबाबत सर्वच राजकीय पक्षांना सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नयेत असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोर्टाचे देखील गर्दी जमावू नयेत असे आदेश आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी कोर्टाच्या आदेशांचा अभ्यास करावा असा सल्ला नवाब मलिक यांनी दिला आहे.

याबाबत अधिक बोलताना नवाब मलिक म्हणाले की, “महाराष्ट्रात काही पालिकांची मुदत संपल्यामुळे त्याठिकाणी कोरोनामुळे निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. त्याठिकाणी प्रशासक नेमण्यात आलेला आहे. परंतु कोविड असताना नेमणुकांच्या बाबत जाणूनबुजून कुठेही प्रशासक नेमण्याच्या तयारीत सरकार नाही.

परंतु जेव्हा तामिळनाडू, बंगाल येथे निवडणुका झाल्या त्यावेळी दुसरी लाट आली. त्यानंतर न्यायालयातून जे आदेश प्राप्त झाले त्यानुसार निवडणूक आयोगाला जबाबदार धरलं पाहिजे. राजकीय पक्षांवर बोट ठेवण्याचं काम न्यायपालिकांनी केलं. आता सरकार कुठंही प्रयत्नशील नाही प्रशासक नेमून कुठंही पालिका चालवण्याचा आमचा प्रयत्न नाही. कोरोना कमी झाल्यानंतर नक्कीच निवडणुका होतील. ज्यांनी हे आरोप केले आहेत त्यांना वाटतंय की जाणीवपूर्वक हे होत आहे त्यांनी हायकोर्टाच्या आदेशांचा अभ्यास करावा असा सल्ला त्यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments