R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ओबीसी- मराठ्यांत भांडण लावण्याचा कांग्रेसचा अजेंडा आहे का? - विनायक मेटे

ओबीसी- मराठ्यांत भांडण लावण्याचा कांग्रेसचा अजेंडा आहे का? – विनायक मेटे

 

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा गाजत असतांना आता याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यात बैठक होणार आहे. आज होणाऱ्या या बैठकीआधीच मेटे यांनी मोठी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी थेट काँग्रेस OBC आणि मराठा समाजात भांडण लोण्याचा गंभीर आरोप सुद्धा लगावला होता. विनायक मेटे यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना हा इशारा दिला. केद्र सरकारनं राज्याला अधिकार दिल्यानंतरही राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकलं नाही हे आज मी सिद्ध करेन. विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींचा जो मागास आयोग नेमलाय, तो रद्द व्हायला पाहीजे, ओबीसींच्या सोयी सवलतींमुळे अडचण निर्माण झाली आहे, असा दावा मेटेंनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांकडे मागणी सुद्धा ते करणार आहेत.

छत्रपती स्मारक, सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, असे अनेक महत्वाचे विषय आहेत. त्याबाबत आजच्या बैठकीत मुंख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. वडेट्टीवार यांना कुणी तरी सुपारी दिली आहे. त्यामुळे ते वातावरण भंग करत आहेत. समाजात भांडण लावत आहेत. तंटे लावत आहेत. त्यांचे प्रदेशाध्यक्ष अवाक्षर काढत नाहीत, ओबीसी- मराठ्यांत भांडण लावण्याचा कांग्रेसचा अजेंडा आहे का?, असा सवाल त्यांनी केला. त्यासाठीच मंत्र्यांना मोकळं सोडलं का?, कालच बैल पोळा झाला त्यानुळे या बैलांना मोकाट सोडलंय का?, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आम्ही आरक्षणाबद्दल दिलासा कसा दिला जाईल यासाठी प्रयत्न करत आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होतो. पण आज मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली आहे. बरेच मुद्दे आहेत जे मार्गी लागणं गरजेचं आहे. आरक्षणाचा मुद्दा आहे, नेकरभरतीचा मुद्दा आहे. त्यावर आजच्या बैठकीत मुख्यमंत्री निर्णय घेतील ही अपेक्षा आहे. नाहीतर ये रे माझ्या मागल्या असं व्हायला नको. फार्स नको व्हायला, असं मेटे म्हणाले.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments