R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या  'मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत ते तपासावे लागेल' काँग्रेसची जळजळीत टीका

 ‘मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत ते तपासावे लागेल’ काँग्रेसची जळजळीत टीका

 

 

नागपूर |  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असल्याच्या वक्तव्य केलं होता. या विधानावर सर्वत्र आश्चर्य  वक्तव्य करण्यात आलेले असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली. ‘मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत हे तपासावं लागेल’, असा टोला नाना पटोलेंनी लगावला.

 

माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, ‘संविधानात समभावाची भावना विशद करण्यात आली आहे. सर्वधर्म समभावाची भावाना काँग्रेसनेही मांडली आहे. रक्त एक आहे असं म्हणण्यापेक्षा सर्व धर्म समभाव असं मोहन भागवत बोलले असते तर त्याचं स्वागत केलं असतं. डीएनए एक म्हणणारे मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत ते तपासावे लागेल’, असा टोला पटोलेंनी लगावला.

 

 

मोहन भागवतांनी एका कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असल्याचं म्हटलं होतं. प्रत्येक भारतीय हा हिंदू आहे, त्यामुळे मुस्लिम समाजातील विद्वानांनी कट्टरपंथीयांविरोधात उभं राहिलं पाहिजे. ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करून त्यांच्यात भांडणं लावली.त्यामुळेच दोन्ही समाजात एकमेकांवर विश्वास राहिला नाही. आता आपण आपला दृष्टीकोण बदलला हवा, असं मोहन भागवत म्हणाले होते.

 

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments