R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया कोतवालांच्या सर्व समस्या मार्गी लावणार, गुलाबराव पाटील यांनी दिला शब्द !

कोतवालांच्या सर्व समस्या मार्गी लावणार, गुलाबराव पाटील यांनी दिला शब्द !

 

महसूल प्रशासनातील अत्यंत महत्वाचा पण दुर्लक्षीत असणारा घटक म्हणजेच कोतवाल असून त्यांना आज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अल्प मानधन व भत्ते तसेच अन्य शासकीय योजनांच्या लाभांपासून त्यांना वंचीत रहावे लागत असल्याबाबत राज्य कोतवाल संघटनेने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना साकडे घातले असता, त्यांनी याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्याबाबत अनुकुलता दर्शविली. आपण याबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रश्‍न उपस्थित करून राज्यातील कोतवालांना न्याय्य हक्क मिळवून देणार असल्याची ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
याबाबत वृत्त असे की, कोतवाल हा महसूलमधील अविभाज्य घटक आहे. तो तलाठ्याचा सहाय्यक म्हणून काम करत असतो. राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी तो ग्रामसेवक आणि तलाठ्यांना मदत करतो. दुष्काळ वा अतिवृष्टीचे पंचनामे करण्यापासून ते दुष्काळ यादी, गावातील नुकसानीची माहिती प्रशासनाला देण्याचे काम कोतवाल करत असतो. मात्र कोतवालांच्या अनेक समस्या प्रलंबीत असून या अनुषंगाने राज्य कोतवाल संघटनेच्या जिल्हा शाखेने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना निवेदनाच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण करण्यासाठी साकडे घातले.

काय आहेत मागण्या

1) या मागण्यांमध्ये प्रामुख्याने कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा आणि हा दर्जा मिळण्यापर्यंत सर्वांना सरसकट १५ हजार रूपये महिना इतके मानधन मिळावे.

2) कोतवालांना सेवानिवृत्ती नंतर कोणतेही लाभ मिळत नसल्याने त्यांनी सरसकट १० लाख रूपये निर्वाह भत्ता म्हणून मिळावेत.

3) कोतवाल संवर्गासाठी राज्य सरकारने ६/०२/२०१९ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार नागपूर मार्गदर्शनामुळे पत्र असूनही कोतवालांना वेतवाढ मिळालेली नाही. यामुळे हे मार्गदर्शन रद्द करण्यात यावे.

4) तलाठी, महसूल सहाय्यक आणि तत्सम पदे भरतांना कोतवालांना ५० टक्के इतके आरक्षण असावे. शासनाच्या महसूल विभागासोबतच अन्य विभागांमधील शिपायांच्या जागा कोतवालांमधून भरण्यात याव्यात आणि कोरोनाने मयत झालेल्या कोतवाल कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी या मागण्यांचा समावेश आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या, भाजपच्या या नेत्यानं साधला निशाणा

  खासदार मोहन डेलकर यांच्यानंतर शिवसेनेकडून दादरा नगर- हवेली लोकसभा पोटनिवडणुकीकरिता मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दादरा नगर- हवेली...

समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव ‘दाऊद?? मालिकांनी दिला आणखी एक पुरावा

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. त्यातच एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने...

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments