R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या रुग्णालयं उघडू की मंदिरं उघडू? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

रुग्णालयं उघडू की मंदिरं उघडू? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

 

राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अद्याप मंदिराचे दार बंद ठेवण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी ठाकरे सरकार विरोधात आंदोलने करुन मंदिर उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन केले होते. आता मंदिरासाठी आंदोलन करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावत थेट प्रश्न विचारला आहे.

कोविडचा काळ अजूनही सरलेला नाहीए. या काळात आपण राजकारण न करता जबाबदारीने वागलं पाहिजे, सध्या आरोग्यकेंद्रांची गरज आहे, मंदिरंही उघडणार पण टप्प्याटप्पयाने असं सांगत मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयं उघडू की मंदिरं उघडू, अशा कानपिचक्या दिल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध उपक्रमांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं यावेळी त्यांनी जोरदार टोला लगावला होतं.

या कार्यक्रमाला शिवसेना आणि भाजपा नेते एकाच व्यासपीठावर होते. केंद्रीय मंत्री कपिल पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित होते.’आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं मात्र सुरु आहेत. आजच्या परिस्थितीत आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे. आरोग्याची मंदिरं ही महत्त्वाची आहेत. मंदिरही उघडणार पण टप्पाटप्प्याने जाणार आहोत. आपण घोषणा देताना भारत माता की जय, वंदे मातरम द्यायला चांगल्या आहेत. आम्हीही त्या घोषणा दिलेल्या आहेत. घोषणेच्या पुढे जात आम्ही हिंदुत्वाचं रक्षण केलेलं आहे. हे 92-93 साली दाखवून दिलेलं आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटलं आहे.

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

Recent Comments