R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या केंद्रीय मंत्री जोतिरादित्य शिंदे करणार चिपी विमानतळाचे उदघाटन, राणेंनी पुन्हा सेनेला डिवचले

केंद्रीय मंत्री जोतिरादित्य शिंदे करणार चिपी विमानतळाचे उदघाटन, राणेंनी पुन्हा सेनेला डिवचले

राज्यात मागच्या काही दिवसांपासून राणे – शिवसेना वाद उफाळून आलेला पाहायला मिळत आहे . त्यात पोस्टरबाजी करून दोन्ही बाजूंनी एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यात मागच्या सात वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले आणि सिंधुदूर्गला हवाईमार्गाने जोडणारे चिपी विमानतळ ९ ऑक्टोबरपासून सुरु होईल, अशी घोषणा करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती.

मात्र त्या पाठोपाठ शिवसेनेवर निशाणा साधत म्हणाले, वसुलीत शिवसेनेचे नेते मास्टर आहेत. गेल्या सात वर्षापासून तयार असलेले चिपी विमानतळ सुरु करण्यासाठी शिवसेनेने काहीही केले नाही. शिवसेना नेते फक्त वसुलीत मास्टर आहेत, ते कोणतेही काम करीत नाहीत, असा आरोपही राणे यांनी यावेळी केला. पत्रकारांशी बोलतांना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, केंद्रीय नागरी उड्डयणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पुढाकार घेतल्याने ९ ऑक्टोबरपासून हे विमानतळ सुरु होत आहे.

२०१४ पर्यंत मी हे विमानतळ उभारण्याचे काम पूर्ण केले; परंतु, शिवसेनेने गेली सात वर्षे काहीही केले नाही. ७ ऑक्टोबर रोजी या विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचा शिवसेनेच्या खासदाराचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. शिवसेनेचा कोणताही दावा निराधार असतो. केंद्रात मंत्रिपद दिल्यापासून नारायण राणे शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. या टीकेमुळे मंत्रिपद स्वीकारल्यानंतर राज्यात काढलेली जनआशीर्वाद यात्राही वादात सापडली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबबात केलेल्या वादगस्त वक्तव्यामुळे राणे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments