R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या टीका करणाऱ्याला घरात घुसून सदाभाऊ खोत यांच्या मुलाने केला तलवारीनं मारण्याचा प्रयत्न...

टीका करणाऱ्याला घरात घुसून सदाभाऊ खोत यांच्या मुलाने केला तलवारीनं मारण्याचा प्रयत्न !

सांगली | पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चात आमदार आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केल्याच्या कारणातून खोत यांचा मुलगा सागर खोत यानं आपल्या साथीदाराच्या मदतीनं टीका करणाऱ्यावर सशस्त्र हल्ला केला आहे. संशयित आरोपी सागर यानं आपल्या साथीदारांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष रविकिरण मानेच्या घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवत शिवीगाळ करत मारहाण केली होती.

या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर घटना सोमवारी रात्री वाळवा तालुक्यातील तांबवे याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी कासेगाव पोलीस ठाण्यात सागर सदाभाऊ खोत, स्वप्निल सुर्यवंशी, अभिजीत भांबुरे आणि सत्यजित कदम अशा चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री रविकिरण माने आपल्या कुटुंबासोबत जेवण करत होते.

दरम्यान संशयित आरोपी सागर खोत आपल्या साथीदारांसह चाकू, तलवार, गुप्ती अशी प्राणघातक शस्त्र घेऊन माने यांच्या घरात शिरला. याठिकाणी आमदार पूत्र सागरनं ‘तू सदाभाऊंवर टीका करतोस का? तुला खूप मस्ती आली आहे का?’ असं म्हणत मारहाण आणि शिवीगाळ केली आहे. यावेळी माने यांच्या परिवाराला सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली होती.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments