R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या सोमय्या यांनी वळवला पुन्हा सरनाईक यांच्याकडे मोर्चा, सोमय्यांनी पालिका आयुक्तांकडे केली कारवाईची...

सोमय्या यांनी वळवला पुन्हा सरनाईक यांच्याकडे मोर्चा, सोमय्यांनी पालिका आयुक्तांकडे केली कारवाईची मागणी

 

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या अडचणी वाढवणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आता आपला मोर्चा पुन्हा एकदा आंदर प्रताप सरनाईक यांच्याकडे वळवला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांप्रकरणी त्यांच्याकडून २१ कोटी रुपये वसूल करावे, अशी मागणी केली.

किरीट सोमय्या यांनी आज ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेऊन त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधला. आम्ही पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची भेट घेतली. विहंग गार्डन इमारतमधील लोकांची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे.

तसेच सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांबाबत पालिकेने त्यांच्याकडून २१ कोटी रुपयांचा दंड वसूल करावा अशी मागणी मी आयुक्तांना केली आहे. त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी मी आज आलो होतो, असं सोमय्या म्हणाले. सरनाईक यांच्याकडून अद्यापही हा दंड वसूल झाला नाही. ठाकरे सरकार सरनाईक यांच्याकडून 21 कोटी दंड का वसूल करत नाही? सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी करणार? असा सवाल त्यांनी केला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments