R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ठाकरे सरकारमध्ये होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराबाबत नीलम गोऱ्हे यांचे मौन का?

ठाकरे सरकारमध्ये होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराबाबत नीलम गोऱ्हे यांचे मौन का?

 

विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर बसलेल्या नीलम गोऱ्हे आता खुर्ची टिकविण्यासाठी ठाकरे कुटुंबाची मर्जी राखण्याची धडपड करत असून महिलांवरील अत्याचाराबाबत मात्र त्यांनी तोंडास कुलुप घातले आहे. स्त्री हक्काचा आधार घेत राजकीय बस्तान बसविणाऱ्या नीलम गोऱ्हे राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचार होत असताना आता कोठे आहेत, असा सवाल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती स्मिता वाघ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेस मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे पोटदुखी होऊन ठाकरे सरकारने त्यांना केलेल्या अटकेनंतर नीलम गोऱ्हे यांची जीभ घसरली, आणि त्यांनी राजकीय शेरेबाजी केली. आपली खुर्ची शाबूत राखण्यासाठी ठाकरे कुटुंबाची खुशामत करणे गरजेचे असल्याने तसे करताना आपल्या पदाच्या जबाबदारीचे भानदेखील नीलम गोऱ्हे यांना राहिले नाही.

पुढे पत्रकात म्हंटले आहे की, विधान परिषदेचे उपसभापतीपद हे पक्षनिरपेक्ष असले पाहिजे. मात्र ठाकरे यांची मर्जी राखण्यासाठी त्यांना आपल्या पदाच्या प्रतिष्ठेचेही भान राहिले नाही. राज्यात दररोज महिलांवर होत असलेल्या अत्याचारांविरुद्ध बोलताना त्यांच्या तोंडास कुलुप बसते. केवळ ठाकरे यांची मर्जी सांभाळण्याकरिता महिलांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करणाऱ्या गोऱ्हे यांनी हिंमत असेल तर राज्यात सुरू असलेल्या महिला अत्याचारांचे पाढे सरकारसमोर वाचावेत असे आव्हान त्यांनी गोऱ्हे यांना केले आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments