R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पुन्हा नारायण राणे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष !

पुन्हा नारायण राणे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष !

 

मुंबई | मंत्री नारायण राणेंची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्याकडे राज्यात जनआर्शीवाद यात्रेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात जो राजकीय वाद सुरू झाला. तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमात काय घडणार आहे याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे .

सिंधुदुर्गातील चिंपी विमानतळाचं येत्या ९ ऑक्टोबर रोजी उद्घाटन होत आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार, खासदार हे देखील उपस्थितीत राहणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

विमानतळाच्या उद्घाटनसाठी मुख्यमंत्री हवाच असं काही नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांना बोलावायचं की नाही याचा अधिकार राणेंना कुणी दिला?, राणे कोण लागून चालले?, असा प्रश्न करत विनायक राऊत यांनी करत राणेंवर पलटवार केला आहे. तर राणेंच्या वक्तव्याशी भाजप नेते असहमती दर्शवत आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments