R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अहवाल बदलण्यासाठी दिले पाच लाख, परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढणार !

अहवाल बदलण्यासाठी दिले पाच लाख, परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढणार !

अँटालिया स्फोटके प्रकरणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘जैश-उल-हिंद’च्या टेलिग्रामवरील पोस्टबाबतचा अहवाल सोयीप्रमाणे बदलून सादर करण्यासाठी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आपल्याला पाच लाख रुपये दिले, असा खुलासा अहवाल सादर करणाऱ्या सायबर तज्ज्ञाने केल्याचे NIA ने दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

सायबर तज्ज्ञाने NIA ला सांगितले की, त्याचा अहवाल प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी प्रकरणाशी संबंधित नाही. अहवालात सुधारणा करण्याचे आदेश तत्कालीन मुंबई पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी मला दिले होते. यासाठी तीन लाख रुपये देण्याचे ठरविण्यात आले. मात्र, पाच लाख रुपये दिले. त्याने दिलेल्या सेवेसाठी तो इतके पैसे मिळवण्यास पात्र आहे, असे सिंह यांनी म्हटले.

एनआयएने अँटालिया स्फोटके प्रकरणी दाखल केलेल्या १० हजार पानी आरोपपत्राला साक्षीदारांच्या जबाबांचीही प्रत जोडण्यात आली आहे. त्यात सायबर सेल तज्ज्ञाच्या जबाबाचाही समावेश आहे. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटीनने भरलेली एसयूव्ही सापडली तेव्हा दहशतवादी संघटना ‘जैश-उल-हिंद’ने त्यांचे सोशल प्लॅटफॉर्म टेलिग्रामवरून त्याची जबाबदारी घेतली.

सायबर सेल तज्ज्ञाने एनआयएला दिलेल्या जबाबानुसार, तो त्याच दिवशी परमवीर सिंह यांना भेटला. जानेवारी २०२१ मध्ये इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी त्याने दिल्ली पोलिसांना मदत केल्याचे सिंह यांना सांगितले. या स्फोटाची जबाबदारी घेणाऱ्या ‘जैश-उल-हिंद’ची लिंक दिल्लीमधील तिहार कारागृहाशी आहे. पोस्ट टाकण्यासाठी तिहार कारागृहातला मोबाइल वापरण्यात आल्याचे त्याने सिंग यांना सांगितले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments