R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश मुंबई मनपाचा मोठा निर्णय, १२ जुन्या उड्डाणपुलांच्या जागी नव्या उड्डाणपुलाची करण्यात येणार...

मुंबई मनपाचा मोठा निर्णय, १२ जुन्या उड्डाणपुलांच्या जागी नव्या उड्डाणपुलाची करण्यात येणार उभारणी !

 

 

मुंबई वाढत्या लोकसंख्या बरोबर वाढत्या वाहनाच्या संख्यांमुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता मोडकळीच्या परीस्थितीत आलेल्या आणि धोकादायक झालेल्या उड्डाणपुलांमुळे सध्या मुंबईत मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. यावर उतारा म्हणून लवकरच मुंबई महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पातंर्गत मुंबईत केबल आधारित १२ पूल उभारण्यात येणार असून त्यासाठी 1775 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मुंबई महानगरपालिकेने शहरातील १२७ वर्षे जुने पूल पाडून त्याठिकाणी केबल पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुलांचे बांधकाम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि रेल्वे करणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. या पुलांचे काम २०२२ पासून टप्याटप्याने सुरु करण्यात येणार असून २०२५ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

या नव्या पुलांमुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याबरोबरच मुंबईच्या सौदर्यांतही भर पडणार आहे. या पुलांचे बांधकाम सुरु असताना वाहतूक सुरळीत राहील, याची काळजी घेतली जाईल. केबल स्टेड पद्धतीमुळे पुलाचे बांधकाम मजबूत असेल. पायासाठी कमी जागा लागणार असल्याने पूलांखाली अधिक मोकळी जागा उपलब्ध होईल.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

ठाकरे सरकारला जरा जरी लाज असेल तर, भाजपच्या या आमदाराची घणाघाती टीका

  मुंबई | सध्या भारतात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून अनेक शेतकरी आक्रमक होऊन आपल्या हक्कासाठी आंदोलन देखील करत आहेत. अशातच पंढरपूरचे आमदार...

भारत-पाकिस्तान मॅच सुरु असताना ठाण्यात ग्रामस्थ आणि पर्यटकांमध्ये रंगले युद्ध

  ठाणे | टी-२० वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान या प्रतिस्पर्धी असलेल्या संघांचा सामना आज खेळला जात होता. हा सामना दुबईत सुरू असला तरी दोन्ही देशांमध्ये उत्साहाचे वातावरण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments