R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का ? शिवसेनेच देऊळ बंदीच...

डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का ? शिवसेनेच देऊळ बंदीच अभियान

 

मुंबई | एका कार्यक्रमात मुख्यमंत्री राज्याला संबोधून म्हणाले की राज्याला मंदिरांची गरज आहे की आरोग्य मंदिरांची गरज आहे ? आरोग्य केंद्र बंद करु आणि मंदिर उघडू का ?मंदिर आणि आरोग्य मंदिर या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता का दाखवतायत हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का ? असा आमचा सवाल आहे. डिस्को, बार, पब बाबत आपण काही बोलणार आहात का याच उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. कट कमिशन आणि वाटाघाटी हा या ठाकरे सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कारण कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सँनिटझर वाटप, सँनिटायझेशन या सगळ्या पुरवठा धारकांमध्ये जी काही कट कमिशनची प्रकरण समोर येतायत याच्यावर तुम्ही कधी भाष्य करणार आहात का? पब, रेस्टाँरंट, डिस्को, बार यांचे मालक यांच्याशी वाटाघाटी होतात आणि वाटाघाटी नंतर ते खुले होतात.

कट कमिशन या धोरणाने तुम्ही निर्णय करता का ? एक्साईजची कमाई हवी म्हणुन दारुची दुकानं उघडी केलीत, माँल मधल्या कामगारांच कारण सांगून माँल उघडे केलेत मग या मंदिरांच्या बाहेर नारळ,अगरबत्ती, धुप, फुल विकणारे यांची उपासमार दिसत नाही? त्यांना जगण्याचा अधिकार नाही? मंदिरात किती लोक आले पाहिजेत या बद्दल कोरोनाचे नियम करुन बाहेर नारळ,अगरबत्ती, फुल विकणार्यांच पोट भरु शकत नाही का? यांच्याशी वाटाघाटी होउ शकत नाही कारण आमचा तो गरीव माणूस या सरकारच्या अपेक्षा काय पुर्ण करणार? म्हणून त्यांना बंदी त्यांच्यावर निर्बँध आणि डिस्को, पब, बार वाले वाटाघाटी करतील, आरोग्य केंद्रात कट कमिशन मिळेल या पद्धतीची भुमिका. आरोग्य केंद्र हवीच पण कट कमिशन नको ही आमची भुमिका आहे. खरतर भक्त आणि देव यांची ताटातूट करण्याच काम शिवसेना करतेय. मग गोविंदा असेल, गणेशोत्सव असेल नवरात्र असेल, मंदिर असतील. नियमात राहुन सुरु करु ही भुमिका नाही. भक्तांची देवापासुन ताटातूट करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणुन हा करोना बंदीचा कार्यक्रम नाही तर हे देउळ बंदीच शिवसेनेच अभियान आहे.

ज्या पद्धतीने हे प्रकार चालु आहेत त्यावर मुख्यमंत्री कधी बोलतील का हा प्रश्न आहे. आरोग्य केंद्राच बोलतात तर माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे इथून जवळच असलेल्या ठाणे जिल्ह्यामधे आदिवासी पाड्यातील ७४१ बालकांचा ६ महिन्यात मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कुठे आहे आरोग्य व्यवस्था, कुठे आहेत आऱोग्य केंद्र? कुठे आहेत पायाभुत सुविधा देवालय नको तुम्हाला चालेल, ही तुमची भुमिका असेल पण देवालय बंद करुन एका अर्थाने राज्यभर शवालय तुम्ही उघडली आहेत. महानगरपालिकेच्या इस्पितळात डोळा कुरतडून खाल्ला म्हणुन मृत्यू, सायन ते नायर शवाच्या बाजुला जिवंत माणसाची ट्रिटमेंट, कोविड सेंटर मधे टाँयलेट मधे मृत्यू आणि आता बालकांचा मृत्यू. थोडी तरी संवेदनशीलता मुख्यमंत्री दाखवा…. करोना बंदीच्या नावावर देउळ बंदी करु नका.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

इंधन दरवाढीवर आंदोलन करणारा भाजप आता गप्प का ?

  मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आज बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली असताना त्यात दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य व्यक्ती हतबल झाला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments