R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजपा देणार करुणा शर्मा यांना पाठिंबा, चंद्रकांत पाटील यांनी दिला शब्द

भाजपा देणार करुणा शर्मा यांना पाठिंबा, चंद्रकांत पाटील यांनी दिला शब्द

 

पुणे | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा या एकट्या लढत असून भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे आता याच मुद्द्यावरून भाजपने राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा या त्यांच्या पत्नी आहेत व त्यांना धनंजय मुंडे यांच्यापासून दोन मुले झाल्याची जाहीर कबुली दिली आहे. करुणा शर्मा या परळी येथे गेल्यानंतर त्यांना गुन्ह्यात गोवण्यात आले. त्यांच्या बनावट आवाजात क्लिप तयार करून व्हायरल करण्यात आली. त्यांच्या गाडीत एक महिला पिस्तूल ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

करुणा मुंडे यांच्या गाडीच्या चालकावरही अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केली आहे. ॲट्रॉसिटी कायद्याचा इतका दुरुपयोग कधी पाहिला नव्हता. करुणा शर्मा एकट्या लढत आहेत. अशा स्थितीत भाजपा करुणा शर्मा यांच्या पाठीशी राहील. त्यांना न्यायालयात साथ देणे व त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत विचार करेल असे सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments