R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करणार

कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करणार

कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. आजरा तालुक्यातील मौजे आर्दाळ येथे जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वतीने आंबेओहोळ मध्यम प्रकल्पाचे लोकार्पण व जलपूजन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, पाण्याची उपलब्धता असेल तर शेतकऱ्याची सोय होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याला यश येऊन आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचा लाभ घेऊन येथील शेतकरी या भागाचं सोनं करतील, असा विश्वास व्यक्त करुन या प्रकल्पासाठी योगदान दिलेल्या सर्व घटकांना त्यांनी धन्यवाद दिले.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, जलसंपदा विभागाचे प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या असून त्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी, सर्पनाला, नागणवाडी, उचंगी व सोनुर्ले हे सर्व प्रकल्प जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन केले असून यासाठी गतीने कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली होती.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments