R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home देश धोनी विरुद्ध रवी शास्त्री वाद रंगला तर? वाचा काय आहे प्रकरण !

धोनी विरुद्ध रवी शास्त्री वाद रंगला तर? वाचा काय आहे प्रकरण !

 

नवी दिल्ली | बहुप्रतिक्षित टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात BCCI ने अंतिम 15 खेळाडूंसह 3 राखीव खेळाडूंची नावं जाहीर केली. या सर्वांसोबत एक अत्यंत महत्त्वाची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा विश्व चषकासाठी खेळणाऱ्या संघाचा मेन्टॉर अर्थात मार्गदर्शक असणार आहे. दरम्यान या नव्या पदानंतर आता मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मेन्टॉर धोनी यांच्यात संघ व्यवस्थापन किंवा सामन्याच्या तयारीदरम्यान वाद झाला तर? अशी भिती माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली आहे.

गावस्कर यांनी आज तक या वृत्तसंस्थेशी बोलत असताना धोनीच्या मेन्टॉर होण्याबाबत आनंद असल्याचे सांगतानाच फक्त धोनी आणि शास्त्री यांच्यात वाद होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी स्वत:बरोबर घडलेल्या एका अनुभवाबद्दल यावेळी सांगितले. 2004 साली जॉन राईट भारताचे मुख्य प्रशिक्षक असताना गावस्कर यांना मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं होतं. त्यावेळी जॉन यांना गावस्कर आपली जागा घेतील असं वाटल्याच गावस्कर म्हणाले.

तसेच धोनी आणि शास्त्रींबद्दल बोलताना ते म्हणाले, ”धोनीला मुळात कोचिंगमध्ये अधिक रस नसून तो रणनीती बनवण्यात हुशार आहे. त्यामुळे शास्त्री आणि धोनीची जोडी जमली तर भारतीय संघाला खूप फायदा होईल हे नक्की. फक्त दोघांमध्ये कोणताच वाद होऊ नये एवढीत अपेक्षा आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतं, काँग्रेसची जळजळीत टीका

  सध्या कर्नाटकात पोट निवडणुकीच्या जोरदार प्रचार सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केली आहे. मात्र आता या पोट निवडणुकीच्या...

” देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये.” केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे.

  राज्यातील वीज उत्पादन संकटास केन्द्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन करण्यात येत असलेल्या आरोपात अजिबात सत्यता नाही. केन्द्र सरकारने राज्य सरकारला पावसाळा...

केंद्रात मंत्री असूनही नारायण राणे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान नाही

  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून आपली नवी टीम जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, माजी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments