R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'पवारांचं वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय' फडणवीसांनी साधला पवारांवर निशाणा !

‘पवारांचं वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय’ फडणवीसांनी साधला पवारांवर निशाणा !

 

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये काँग्रेससंदर्भात घेतलेली भूमिका भाजपाच्या पथ्यावरच पडली आहे. शरद पवारांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांना खडेबोल सुनावले होते मात्र, त्याच मुद्द्यावरून आता राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. त्यामुळे शरद पवारांची भूमिका आणि त्यावरून भाजपाकडून केली जाणारी टीका येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळू शकते.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंदिरं न उघडण्याच्या सरकारच्या निर्णयावर देखील निशाणा साधला. ‘मंदिरं सुरू करण्याची आमची मागणी आहे. आम्ही हिंदू आहोत. आमचे ३३ कोटी देव आहेत. जिथे आम्ही मानू, तिथे आमचे देव आहेत. पण या मंदिरांवर अवलंबून असणारे लाखो लोक आहेत. कुणी फुलं विकतं, कुणी उदबत्ती विकतं, कुणी प्रसाद विकतं, हळद-कुंकू विकतंय. मंदिरांवर अवलंबून असणारे पुजारी, सेवक आहेत असे फडवणीस म्हणाले होते.

गेल्या दोन वर्षांत या लोकांची विदीर्ण अशी अवस्था झाली आहे. म्हणून आम्ही मागणी केली की मदिरालय सुरू होऊ शकतं, तर मंदिरं का सुरू होऊ शकत नाहीत? सोशल डिस्टन्सिंगचे नियम नक्कीच पाळले जावेत. देशभरात सर्व राज्यांमध्ये मंदिरं सुरू आहेत, फक्त महाराष्ट्रात मंदिरं बंद आहेत. त्यामुळे सगळ्यांना गणरायांनी सुबुद्धी द्यावी, तशी सुबुद्धी सरकारलाही लाभू देत’, असं फडणवीस यावेळी बोलून दाखवला होतं.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments