R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या खासदार असदुद्दीन ओवेसींना मोदी-योगींविरोधात केलेली टीका भोवणार !

खासदार असदुद्दीन ओवेसींना मोदी-योगींविरोधात केलेली टीका भोवणार !

 

उत्तर प्रदेश | खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कार्यक्रमात भाषण करत असताना प्रक्षोभक विधाने केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी इथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांचे पालनही करण्यात आले नव्हते, ज्यामुळे देखील त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती.

गुरुवारी बाराबंकी इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याला ओवेसी हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणात ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. ओवेसी यांनी आरोप केला आहे की रामसनेही घाटावर असलेली 100 वर्ष जुनी मशीद प्रशासनाने तोडून टाकली.

पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना ओवेसी म्हणाले की देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील धर्मनिरपेक्षता नष्ट करण्याचे आणि देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं ओवेसी यांचं म्हणणं आहे. या भाषणात ओवेसींनी केलेल्या वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधानांमुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments