R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुंबई, पुण्यासह कोकणाला 'आज आणि उद्या यलो अलर्ट, तर १३-१४ सप्टेंबरला ऑरेंज...

मुंबई, पुण्यासह कोकणाला ‘आज आणि उद्या यलो अलर्ट, तर १३-१४ सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट

 

मुंबई | गणेशाच्या आगमनानंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून राज्यातील काही भागात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, आज आणि उद्या यलो अलर्ट, तर १३-१४ सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. मागील एका आठवड्यापासून राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत असून, पुढील काही दिवस पाऊस आणखी जोर धरणार आहे. भारतीय हवामान विभागाने १४ सप्टेंबरपर्यंतचा हवामानाच अंदाज वर्तवला असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट व यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून, कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, याचा परिणाम राज्यात दिसून येणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे आज रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

Recent Comments