R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुंबई साकीनाका येथे झालेली बलात्काराची घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक !

मुंबई साकीनाका येथे झालेली बलात्काराची घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक !

 

मुंबई | साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिशय चीड आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेवर बलात्कार करून त्या महिलेच्या गुप्तांगात लोखंडी सळी सारखी वस्तू घुसवून तिला गंभीर जखमी केले आहे. तर ती महिला आता मृत्यूशी झुंज देत आहे. सकिनाका खैरनी रोड येथील एका स्टुडिओजवळ एका टेम्पोत हा सर्व प्रकार घडला आहे. या घटनेवरून संपूणर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आरोपांना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

ते म्हणाले की, मुंबई साकीनाका येथे झालेली बलात्काराची घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या पीडितेवर उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्लीतील निर्भयासारखी धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. याबाबत संताप व्यक्त होत आहे. शहरातील साकीनाका भागात महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेनंतर महिलेची प्रकृती चिंताजनक झाली आहे. या घटनेप्रकरणी एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments