R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'निर्भया' प्रकरणाची आठवण करून देणारी क्रूर घटना घडली मुंबईत !

‘निर्भया’ प्रकरणाची आठवण करून देणारी क्रूर घटना घडली मुंबईत !

 

मुंबई | दिल्लीत २०१२ साली घडलेल्या ‘निर्भया’ प्रकरणाची आठवण करून देणारी घटना आता मुंबईत घडली असून या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. या घटनेत त्या नराधमाने ३४ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घालला होता. सध्या त्या महिलेची ची प्रकृती चिंताजनक असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील कांदीवली येथील खैरानी रोड येथे ही क्रूर घटना घडली. या प्रकरणात मोहन चौहान (वय ४५) यास अटक करण्यात आली आहे. चौहान याने एका टेम्पोमध्ये महिलेवर बलात्कार केला. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. एक व्यक्ती महिलेला मारहाण करीत असल्याचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला पहाटेच्या सुमारास करण्यात आला.

पोलीस स्थानकात फोन वाजताच काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक तपासात तिच्यावर बलात्कार झाल्याचे आणि गुप्तांगात लोखंडी रॉड घालण्यात आल्याचे आढळले. संबंधित टेम्पोमध्येही रक्त आढळले आहे. संबंधित महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments