R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं अक्षय कुमारला पत्र म्हणाले की,

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं अक्षय कुमारला पत्र म्हणाले की,

 

नवी दिल्ली | अभिनेता अक्षय कुमारची आई अरूणा भाटिया यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होत. अरूणा भाटिया या 77 वर्षांच्या होत्या. त्या काही दिवसांपासून आजारी असल्यानं त्यांच्यावर मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचाराददरम्यान त्यांची प्रनजोत मालवली होती. आपल्या आईच्या निधनाने अक्षय सध्या दु:खात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षयच्या दु:खात सहभागी होत सांत्वनपर पत्र लिहिलं आहे.

जर मला तुला हे पत्र लिहावं लागलं नसतं तर किती चांगलं झालं असतं. आई अरूणा भाटिया यांच्या निधनाच्या वार्ता ऐकून खूप दु:ख झालं. जेव्हा सकाळी फोनवर बोललो तेव्हा तु खूप दु:खी होतास. आई तुझ्यासाठी सर्वस्व होती, असं तु लिहिलं होतं. तुझ्या आई तुझ्यामागे खंबीरपणे उभी होती. आता तू स्वत:ला सावर, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षय कुमारला धीर दिला आहे.

अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहलेलं पत्र त्याच्या इंन्स्टाग्रामवरून शेअर केलं आहे. अक्षय पत्र शेअर करताना लिहितो की, आईच्या निधनाबद्दल तुम्ही सर्वांनीं पाठवलेल्या शोक संदेशाबद्दल मी विनम्रपणे सर्वांचा आभारी आहे. तुमचा वेळ काढत माझ्या दिवगंत पालकांबद्दल उबदार भावना प्रकट करण्यासाठी माननीय पंतप्रधानांचे आभार. आपले हे सांत्वनदायक शब्द माझ्या कायम सोबत राहतील. जय आंबे, असं अक्षयने इंन्स्टाग्रामवर लिहिलं आहे.

 

 

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘मी चांगला वडील नाही’, आर्यनच्या प्रकरणानंतर शाहरुख खानने व्यक्त केली खंत

  अभिनेता शाहरुख गेल्या काही दिवसांपासून पुत्रआर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे खूप चर्चेत आला आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीनंतर आर्यनला आता आणखी पाच दिवस तुरूंगात राहावे लागणार...

एनसीबी’ने निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरी केली छापेमारी, कार्यालयाची घेतली झाडाझडती !

  मुंबई | क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. एनसीबी'ने आता चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या बांद्रा येथील घरावर आणि कार्यालयावर छापा...

आर्यनच्या अटकेनंतर बहीण सुहाना खान हिने ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी लढवली ही शक्कल

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवण्यात आले आहे. एनसीबीने आर्यनला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावरील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments