R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या उध्दव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस,

उध्दव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस,

 

मुंबई | २०२२ उत्तरप्रदेश निवडणूकीत सर्वच्या सर्व जागा लढवण्याची घोषणा शिवसेनेने केली. मात्र त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्ही १०० जागा लढवणार आहोत अशी घोषणा केली. यावरून भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा, असं सोमय्या यांनी म्हंटल आहे. शिवसेनेचे उत्तर प्रदेशचे प्रभारी विश्वजीत सिंह यांनी एक पत्रक जारी करून उत्तर प्रदेशात निवडणुका लढविण्याची घोषणा केली. याबाबत सोमय्या म्हणाले, यापूर्वी बिहारमध्ये निवडणूक लढवताना शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझीट जप्त होण्याबरोबरच काही उमेदवारांना १०० मतंही पडली नव्हती. पण उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे.

सेनेने योगी आदित्यनाथ सरकारवर टीका काढलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, राज्यामध्ये शिक्षण, रोजगार, कायदा सुव्यवस्था यासारखे प्रश्न सध्या सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या कार्यकाळात निर्माण झाल्याचं सांगतानाच भाजपाला धडा शिकवण्यासाठी सर्वच्या सर्व मतदारसंघांमधून शिवसेना उमेदवार देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. १० सप्टेंबर रोजी लखनऊमधील हरतगंज येथे शिवसेनेच्या उत्तर प्रदेशमधील नेत्यांची बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आणि पक्षाची वाटचाल कशी असणार यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली. यावेळी सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र अवघ्या काही तासातच निर्णय बदलण्यात आला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

नाशिक महानगर पालिका जिंकण्यासाठी संजय राऊतांची मोर्चेबांधणी सुरु

  नाशिक | नाशिक मनगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऑर्डर तयारी सुरु केली आहे तसेच इतर सर्वच राजकीय...

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

नाशिक महानगर पालिका जिंकण्यासाठी संजय राऊतांची मोर्चेबांधणी सुरु

  नाशिक | नाशिक मनगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऑर्डर तयारी सुरु केली आहे तसेच इतर सर्वच राजकीय...

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

Recent Comments