R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "कामाचा दिवस कोणता आणि सुट्टीचा हा फरकच मोदी सरकारने ठेवला नाही, कारण...

“कामाचा दिवस कोणता आणि सुट्टीचा हा फरकच मोदी सरकारने ठेवला नाही, कारण आता सर्वच बेरोजगार झाले आहेत”

 

देशात मोदी सरकार आल्या पासून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हे सतत विविध मुद्द्यावरून आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरून मोदी सरकारला धारेवर धरत असतात. देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ तसेच कोरोना काळात केंद्राला आलेले अपयश याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला घेरले होते. आता पुन्हा एकदा वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहे.

मोदी सरकारच्या कारकीर्दीत नोकऱ्याच उपलब्ध होत नसल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. ते म्हणाले की, बेरोजगारी इतकी वाढली आहे की, आठवड्याची सुटी व कामाचे दिवस यांच्यातला पूर्वी जो फरक होता तोच संपत चाललेला आहे. हाताला काम नाही अशी अनेकांची स्थिती आहे अशी टीका राहुल ग्नादी यांनी मोदी सरकारवर केली आहे.

भारतात करत असलेली वाहननिर्मिती थांबविण्याचा निर्णय फोर्ड या अमेरिकी कंपनीने घेतला आहे. त्यामुळे ४ हजार लघुउद्योगही बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भातील बातमीचा हवाला देत राहुल गांधी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, काम नसलेला दिवस कोणता व सुट्टीचा दिवस कोणता यातला फरक ओळखता येणार नाही अशी स्थिती मोदी सरकारच्या काळात निर्माण झाली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर बेकारी वाढत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments