R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या गणेशोत्सव आगमनाच्या मिरवणुकीत कोरोनाविषयक नियमांचा भंग केल्याप्रकरणी कोल्हापुरातील मंडळांवर गुन्हा दाखल

गणेशोत्सव आगमनाच्या मिरवणुकीत कोरोनाविषयक नियमांचा भंग केल्याप्रकरणी कोल्हापुरातील मंडळांवर गुन्हा दाखल

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी अत्यंत सध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान राज्य सरकारकडून करण्यात आले होते. तसेच नियम मोडणाऱ्यांवर कडक अर्वही करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला होता. मात्र या निर्णयाविरोधात अनेक मंडळांनी नाराजी दर्शवली होती. त्यातच आता गणेशोत्सव आगमनाच्या मिरवणुकीत कोरोनाविषयक नियमांचा भंग केल्याप्रकरणी कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. यात माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी, ढोल वादक पथकातील सदस्य अशा १२५ जणांचा समावेश आहे. या मंडळाने बंदी असतांना पापाची तिकटी येथून श्री गणेशमूर्तीच्या आगमनाची मिरवणूक काढल्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याचसमवेत राजारामपुरी परिसरात कोरोनाविषयक नियमाचा भंग करून गर्दी करत मिरवणूक काढल्याप्रकरणी दोन मंडळांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या पूर्वी कोल्हापूर शहरात गोकुळ निवडणूक असो वा झालेले अनेक राजकीय कार्यक्रम, सभा, आंदोलने येथे कोरोनाविषयक नियमांची सर्रास पायमल्ली करण्यात आली होती. तेव्हा कुठेही त्यांच्यावर गुन्हे नोंद केल्याचे ऐकीवात नाही असा प्रश्न आता हिंदुत्वादी संघटना विचारू लागल्या आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments