R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति "पक्षात येण्यासाठी भाजपने पैश्यांची ऑफर दिली होती" या आमदाराचा खबळजनक खुलासा !

“पक्षात येण्यासाठी भाजपने पैश्यांची ऑफर दिली होती” या आमदाराचा खबळजनक खुलासा !

 

भारतीय जनता पक्षावर अनेकवेळा आमदार विकत घेण्याचे आरोप विविध राज्यांमध्ये लागण्यात आपले आहे. अशीच काहीशी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये सुद्धा दिसून आली होती. याच मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका सुद्धा केली होती. आता पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये काँग्रेसमधून भाजपवासी झालेले आमदार श्रीमंत पाटील यांनी एक धक्कादायक खुलासा केलाआहे.

भाजपमध्ये येण्यासाठी आपल्याला पैश्यांची ऑफर दिली होती असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. मात्र काही वेळातच त्यांनी या वक्तव्यावरून यु टर्न घेत आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगितले. श्रीमंत पाटील हे कर्नाटकातील कागवाड विधानसभेचे आमदार आहेत. ते माजी मंत्री असून जेव्हा अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये सामील झाले होते त्यात श्रीमंत पाटील यांचाही समावेश होता.

काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. श्रीमंत पाटील यांना मंत्रिपद मिळेल अशी चिन्हे होती, परंतु त्यांना मंत्रिपद मिळाले नाही.त्यामुळे नाराज झालेल्या आमदार पाटील म्हणाले की, भाजपमध्ये सामील होण्यासाठी मला पक्षाकडून पैश्यांची ऑफर देण्यात आली होती. तरी पैसे न घेता मी पक्षात सामील झालो. जनतेच्या सेवेसाठी मला मंत्रिपद हवे होते. पक्षाने मला मंत्रिपदाचे वचन दिले आहे. पुढील वेळी नक्की आपला विचार होईल असे पक्षाने आपल्याला सांगितल्याचे पाटील यांनी सांगितले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

निवडणूकीला जो बायडन घेऊन या; संजय राऊतांचा भाजपला टोला

  दादरा नगर हवेलीत होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कंबर कसली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. या पोट निवडणुकीच्या निमित्ताने अनेक...

“प्रशांत किशोरांनी पक्षात प्रवेश करावा मग ज्ञान पाजळावे” काँग्रेसच्या या नेत्याचा सल्ला

  नवी दिल्ली | राजकारणातील चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर सध्या चांगलेच चर्चेत आलेले दिसून येत आहे. किशोर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत अद्याप काही माहिती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments