R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति महिलांच्या सुरक्षेबाबत मुंबई भाजपा महिला शिष्टमंडळाने राज्यपाल महामहिम श्री भगतसिंग कोश्यारी यांची...

महिलांच्या सुरक्षेबाबत मुंबई भाजपा महिला शिष्टमंडळाने राज्यपाल महामहिम श्री भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली

मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार श्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शिष्टमंडळाने आज राज्यपाल, महामहिम श्री भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

महाविकास आघाड़ी सरकारच्या कार्यकाळात महिलांवरील वाढते निर्घृण अत्याचार, गुन्हेगारांचे वाढते मनोबल तसेच महिलांच्या मनातील वाढती असुरक्षितता याबाबत राज्यपाल महामहिम श्री भगतसिंह कोश्यारी यांना अवगत केले. या बरोबरच या महिला शिष्टमंडळाने राज्यपाल महामहिम श्री भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन केले की महाराष्टात शक्ति कायदा लागू केला जावा. महाराष्ट्र सरकारने विशेष विधानसभा सत्र आयोजित करुन शक्ती कायदा लवकरात लवकर पास करावा.

मुंबई मधील साकीनाका येथे झालेल्या निर्घृण गुन्ह्यातील बलात्काऱ्यांना लवकरात लवकर फाशी दिली जावी. तसेच, भाजपा शासन काळात कार्यान्वित केलेली सी. सी. टीवी. कार्यप्रणाली अधिक सृढृढ़ केली जावी.

या महिला शिष्टमंडळात मुंबई भाजपाच्या महिला प्रतिनिधी, आमदार श्रीमती विद्या ठाकूर, आमदार श्रीमती मनीषा चौधरी, आमदार श्रीमती भारती लवेकर, श्रीमती शलाका साळवी, मुंबई महिला मोर्चा अध्यक्षा श्रीमती शीतल गंभीर, मुंबई भाजपाच्या मिडिया प्रभारी श्रीमती श्वेता परुळकर, मुंबई भाजपा युवती प्रमुख पल्लवी सप्रे यांच्या सह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments