R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "संजय राऊत, तुम्ही मुंबईचे पोलीस आयुक्त कधीपासून झालात? चित्र वाघ यांनी उपस्थित...

“संजय राऊत, तुम्ही मुंबईचे पोलीस आयुक्त कधीपासून झालात? चित्र वाघ यांनी उपस्थित केला सवाल !

 

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रलेखावरून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती . “संजय राऊत यांचा सामनातला अग्रलेख म्हणजे स्त्रीबाबत असणाऱ्या तालिबानी प्रवृतीचं उदाहरण” असल्याचं म्हणत चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे.

त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की “मला सामनाच्या सर्वेसर्वा रश्मीताई ठाकरे यांना हेच विचारायचं आहे की तुमचा कार्यकारी अशा स्त्री अत्याचारी अमानवीय घटनेचा वापर राजकारणातील हेव्या-दाव्यांसाठी करतो आहे. अशा तालिबानी प्रवृत्तीच्या तुम्ही मुसक्या कधी आवळणार…?” असा सवाल देखील वाघ यांनी विचारला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

“संजय राऊत यांचा सामनातला अग्रलेख म्हणजे त्यांच्यातील स्त्रीबाबत असणाऱ्या तालिबानी प्रवृतीचं हे उदाहरण आहे. अहो राऊत. एका महिलेवरती अमानवीय अत्याचार झालेला आहे. त्यामुळे तिचा ज्या यातनेने मृत्यू झाला असेल. तुम्हाला ते या जन्मातही समजणार नाही. अशा दुर्दैवी घटनेवरती राजकारणाची पोळी भाजण्यासाठी तिचा वापर करता आणि महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशची तुलना करता. नाकर्तेपणा तुमचा गुणधर्म झालेला आहे. फक्त भावनिक गप्पा झोडायच्या आणि मग घटनेनंतर म्हणायचे.ताई, घाबरू नका.. चिंता करू नका.हल्लेखोरांना शिक्षा होईल… आणि फक्त अशी भावनिक भुरळ घालायची…असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments