R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राधानगरीचे चार दरवाजे उघडले; पंचगंगेची पातळी वाढली !

राधानगरीचे चार दरवाजे उघडले; पंचगंगेची पातळी वाढली !

 

कोल्हापूर | काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार बायटिंग करण्यास सुरवात केली असून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाने सुरवात केली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिह्यासह कोकणात जोरदार हजेरी लावली आहे. पाऊस थांबण्याचे अजिबात नाव घेत नसल्यामुळे सांगली, सातारा जिह्यातील नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच कोल्हापुरात सुद्धा पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून पंचगंगेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. कोकणातही रत्नागिरी, सिंधूदूर्ग जिह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. कोल्हापूर जिह्यात सोमवारी सुद्धा सर्वत्र पावसाची संततधार सुरूच राहिली होती. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत दिवसभरात एका फुटाने वाढ झाली आहे.

त्यातचसायंकाळी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले. त्यातील विसर्गामुळे पंचगंगेची पाणीपातळी पुन्हा वाढणार आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत जिह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 64.5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून, 19 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सकाळी 7 वाजता पंचगंगेची 28 फूट असलेल्या पाणीपातळीत संध्याकाळी 9 इंचांची वाढ झाली होती.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments