R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति सरकारला दिशा नसल्याने अराजकता, दरेकरांनी साधला पुन्हा आघाडीवर निशाणा !

सरकारला दिशा नसल्याने अराजकता, दरेकरांनी साधला पुन्हा आघाडीवर निशाणा !

 

राज्यात आघाडी (ठाकरे) सरकार स्थापन झाल्यापासून विविध मुद्द्यावरून विरोधकांनी आघाडी सरकारला घेरण्याची काम केले आहे. त्यातच साकीनाका येथे घडलेल्या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होत. त्यातच आता राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारवर टीका केली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पोलीस खात्यावर कुठलेही नियंत्रण मार्गदर्शन व दिशा नसल्यामुळे राज्यात अराजकता माजली आहे. मुंबई व पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी व महिलांवरील अत्याचार शिगेला पोहोचले असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरूर येथील पत्रकार परिषदेत केला.

मुंबई येथे महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचारातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.राज्यामध्ये गुन्हेगारी व महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असून, राज्यात व तसेच पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात याचा उद्रेक झाला आहे. असे म्हणत त्यांनी थेट पालकमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला.

राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री याच जिल्ह्यातील असून आपण कोठे कमी पडलो, गुन्हे का वाढतात, महिलांवरील अत्याचार कसे वाढतात, याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत कठोर कारवाई व उपायोजना हे सरकार करत नसून वाढत्या गुन्हेगारीला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments