R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला धीर, सर्वतोपरी मदतीचे दिले अश्वासन |

मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला धीर, सर्वतोपरी मदतीचे दिले अश्वासन |

 

मागच्या काही दिवसात परळी तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी, तूर, उडीद मूग, फळबागा आदी उभी पिके पाण्याने अक्षरशः नासून गेली आहेत. या काळात शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये असा धीर राज्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असून झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु आहे. नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यादृष्टीने संयुक्त पंचनामे व अन्य कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत, असे मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील अतिवृष्टी पाहणी दौऱ्यादरम्यान म्हटले आहे.

परळी तालुक्यातील डिग्रस, पोहनेर, बोरखेड, तेलसमुख, ममदापुर आदी गोदा काठच्या गावांना धनंजय मुंडे यांनी सोमवारी भेटी देऊन शेती पिकांचे नुकसान झालेल्या ठिकाणी बांधांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर गोदावरी सह विविध नद्यांना आलेल्या पूरपरिस्थितीचा व त्यामुळे रस्त्यांसह झालेल्या विविध नुकसानीचाही मुंडेंनी आढावा घेतला. यावेळी प्रशासकीय अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

ठाकरे सरकारला जरा जरी लाज असेल तर, भाजपच्या या आमदाराची घणाघाती टीका

  मुंबई | सध्या भारतात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून अनेक शेतकरी आक्रमक होऊन आपल्या हक्कासाठी आंदोलन देखील करत आहेत. अशातच पंढरपूरचे आमदार...

भारत-पाकिस्तान मॅच सुरु असताना ठाण्यात ग्रामस्थ आणि पर्यटकांमध्ये रंगले युद्ध

  ठाणे | टी-२० वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान या प्रतिस्पर्धी असलेल्या संघांचा सामना आज खेळला जात होता. हा सामना दुबईत सुरू असला तरी दोन्ही देशांमध्ये उत्साहाचे वातावरण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments