R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति " राष्ट्रवादी काँग्रेस हा 'रंगलेल्या गालाचा' मुका घेणारा पक्ष" दरेकरांची जीभ घसरली...

” राष्ट्रवादी काँग्रेस हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष” दरेकरांची जीभ घसरली !

 

मुंबई | राज्यात अगदीच सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेत्यांनी जोरदार टीका आघाडीतल्या तिन्ही पक्षावर सुरु ठेवली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीवर टीका करताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जीभ घसरली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही आहे. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष आहे असं वादग्रस्त वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केल आहे. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा १६ सप्टेंबर ला राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. यावरून प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसला टोला लगावला आहे.

प्रवीण दरेकर सोमवारी शिरुर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही आहे. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा बँकवाल्यांचा, कारखानदारांचा पक्ष आहे. तर भाजप हा गोरगरीबांचा पक्ष आहे. अस दरेकरांनी म्हंटले होते.

राज्यात महिलांवर अत्याचार, बलात्कार,विनयभंग होत आहेत. पुण्यनगरीत एक दिवस असा नाही कि बलात्कार अत्याचार होत नाही. राज्यातील या अत्याचार, बलात्काराच्या घटना घडतात या सर्व गोष्टीला सरकारचा नाकार्तेपणा जबाबदार असुन सरकारचा गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश नाही, यांचं प्राधान्य अत्याचाराच्या घटना थांबविण्यासाठी नाही तर सत्ता टिकविण्यासाठी सुरुय असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

निवडणूकीला जो बायडन घेऊन या; संजय राऊतांचा भाजपला टोला

  दादरा नगर हवेलीत होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कंबर कसली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. या पोट निवडणुकीच्या निमित्ताने अनेक...

“प्रशांत किशोरांनी पक्षात प्रवेश करावा मग ज्ञान पाजळावे” काँग्रेसच्या या नेत्याचा सल्ला

  नवी दिल्ली | राजकारणातील चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर सध्या चांगलेच चर्चेत आलेले दिसून येत आहे. किशोर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत अद्याप काही माहिती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments