R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री पदावरून थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपल्याच पक्षातील नेत्यांना लगावला टोला...

मुख्यमंत्री पदावरून थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपल्याच पक्षातील नेत्यांना लगावला टोला !

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी तसेच बेधडक वृत्तीमुळे अनेकदा चर्चेत येतात. आता पुन्हा एकदा अशाच एका विधानामुळे गडकरी पुन्हा एकदा चर्चेत आलेत. सोमवारी नितीन गडकरी राजस्थानच्या जयपूरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहचले यावेळी त्यांनी जाहीर कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री’ पदाविषयी केलेलं एक वक्तव्य देशभरात चांगलेच गाजताना दिसत आहे

‘जे मुख्यमंत्री पदावर आरुढ होतात ते यासाठी चिंताग्रस्त असतात कारण माहीत नाही केव्हा पदावरून पायउतार व्हावं लागेल’ असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी जयपूरमध्ये केलं होत. काही दिवसांपूर्वी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

पक्ष नेतृत्वाच्या निर्देशामुळे विजय रुपाणी यांना पदावरून पायउतार व्हावं लागल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असताना नितीन गडकरींच्या वक्तव्याची आता देशभरात चर्चा होताना दिसत आहे. आजकाल प्रत्येकाच्याच समस्या आहेत, प्रत्येक जण दु:खी आहे. आमदार दु:खी आहेत कारण त्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही. मंत्री दु:खी आहेत कारण त्यांना चांगलं खातं मिळालेलं नाही. चांगला विभाग मिळवणारे यासाठी दु:खी आहेत कारण त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. आणि ज्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं ते यासाठी दु:खी आहेत की कधी राहणार आणि कधी जाणार याचा भरवसा देता येत नाही असे विधान त्यांनी केले होते.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments