R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "वीजबील थकबाकीची वसुली न झाल्यास राज्य अंधारात जाईल "

“वीजबील थकबाकीची वसुली न झाल्यास राज्य अंधारात जाईल “

 

सध्या राज्यात वीजबिल वसुलीचा मुद्धा चांगलाच तापत असून याच मुद्द्यावरून आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोठी भीती व्यक्त केली आहे. वीजबीलाची थकबाकी वसूल झाली नाही तर राज्य अंधारात जाईल असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे. मागच्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रात वीजबिल वसुलीचा मुद्धा तापत असून यावर अद्याप राज्य सरकारने तोडगा काढलेला नाहीये.

वीजबीलाची थकबाकी ही ७९ हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे. त्यासंदर्भात महावितरणचं प्रेझेंटेशन सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आलं. यामध्ये आधीच्या सरकारने बाकी ठेवलेली वसुलीबाबतही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी यावर उपाय व योजना काय करता येतील याबाबत अहवाल तयार करण्यास सांगितलं असल्याची माहिती नितिन राऊत यांनी दिली.

थकबाकी आणि वसुलीचा अहवाल हा राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येईल. तसंच थकबाकीकडे गांभीर्याने पाहिलं नाही तर राज्य अंधारात जाईल अशा इशाराही नितिन राऊत यांनी दिला. उर्जा विभागातील मोठी वसुली अद्याप रखडली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजप सरकारच्या कार्यकाळात थकीत असलेली बिले आता कॅरीफॉरवर्ड झाली असल्याचं नितिन राऊत यांनी सांगितलं.

राऊत म्हणाले की, आधीच्या सरकारने थकबाकीचा डोंगर वाढवून ठेवला. आता कोरोना, अतिवृष्टी या परिस्थितीमुळे वसुली करता आली नाही. त्यामुळे भार अधिक वाढला आहे. महावितरण आर्थिक दृष्ट्या नफ्यात येईल, यावर विचार करण्याची गरज आहे असे नितिन राऊत म्हणाले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments