R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या धक्कदायक माहिती | धारावीतील दहशतवादी जान शेखचे दाऊद गँगशी २० वर्षांपासून संबंध

धक्कदायक माहिती | धारावीतील दहशतवादी जान शेखचे दाऊद गँगशी २० वर्षांपासून संबंध

 

देशात घातपात करण्याचा कट रचणाऱया सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी मंगळवारी विविध राज्यांतून ताब्यात घेतले. या सहा जणांमध्ये धारावीत राहणार जान शेख याचाही समावेश असल्याने महाराष्ट्र एटीएस अधिकच सतर्क झाली आहे. जानचे गेल्या २० वर्षांपासून दाऊद गँगशी संबंध होते अशी माहित समोर येत आहे

मात्र तो दहशतवाद्यांच्या संपर्कात कधी आणि कसा आला याची चौकशी केली जाईल. या दहशतवाद्यांचा देशभरात घातपात करण्याचा कट असला तरी मुंबई आणि महाराष्ट्रात येऊन कोणीही रेकी केलेली नाही. मुंबई पूर्णपणे सुरक्षित असल्याचे एटीएस प्रमुख विनीत अगरवाल यांनी गबुद्धीवरी सांगितले.

दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यापैकी मुंबईच्या जान शेख याला राजस्थानच्या कोटा येथे पकडण्यात आले. त्या वेळी त्याच्याजवळ कोणतेही शस्त्र्ा किंवा आक्षेपार्ह साहित्य सापडले नाही. दिल्ली पोलिसांनी नेमका कोणता गुन्हा दाखल केलाय, केंद्रीय यंत्रणेने त्यांना नेमकी काय माहिती पुरवली होती त्याबद्दल आम्हाला काहीही सांगता येणार नाही, असे अगरवाल यांनी सांगितले.

जान शेख हा दाऊद टोळीच्या संपर्कात होता. २० वर्षांपूर्वी गोळीबार प्रकरणी त्याच्या विरोधात पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. साकीनाका येथे तोडफोड केल्याची नोंद त्याच्याविरोधात आहे. अधेमधे तो फहीमच्या संपर्कात असायचा. तो आमच्या रडारवर होता. त्याच्या हालचालींवर आमची नजर होती. पण तो दहशतवाद्यांच्या संपर्कात कसा आला याची आम्ही दिल्ली पोलिसांकडून माहिती घेणार आहोत, असेही अगरवाल म्हणाले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments