R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या गरीब देश आधीच कोरोना महामारीखाली चिरडले गेलेत त्यांना मदत कार्याला हवी -...

गरीब देश आधीच कोरोना महामारीखाली चिरडले गेलेत त्यांना मदत कार्याला हवी – सामना

 

लसीकरणासाच्या मद्यावरुवून पुन्हा एकदा श्विसीनचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून मोदी सरकारला सल्ला देण्यात आला आहे. श्रीमंत देशांच्या अर्थव्यवस्था जेथे या महामारीने खिळखिळ्या झाल्या आहेत तेथे गरीब देशांची काय कथा? कोरोना संसर्गाच्या महामारीने त्यांची अवस्था पार विकलांग करून टाकली आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे हेच त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. त्यात कोरोना लसीकरणाचा आर्थिक बोजा सहन करणे गरीब देशांसाठी कठीण आहे, ही गीता गोपीनाथ यांची खंत चुकीची नाही. त्यामुळे अशा देशांसाठी जगाने मदतीचा हात पुढे करणं गरजेचं आहे, असं मत सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आले आहे.

संपूर्ण जग मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीशी झुंज देत आहे. त्याविरोधात सर्व पातळ्यांवर उपाय योजले जात आहेत. कोरोना लसीकरणानेही सर्व देशांमध्ये आता वेग पकडला आहे. जगाचा विचार केला तर जगाचं ४० टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे. कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने ही निश्चितच दिलासा देणारी गोष्ट आहे.

तथापि, या समाधानाला एक काळजीची झालरदेखील आहे. जगाचे ४० टक्के लसीकरण झाले असले तरी हे सर्व विकसित आणि विकसनशील देश आहेत. गरीब देश या बाबतीत मागेच आहेत, असं शिवसेनेनं म्हटलंय. विकसित आणि विकसनशील देश आर्थिक अडचणी कमी असल्याने कोरोना, लॉकडाऊन वगैरे तडाखे सोसूनही लसीकरणाचे काम वेगाने करु शकत आहेत. प्रश्न आहे तो दुर्बल आणि गरीब देशांचा. गरीब असणे हा काही त्यांचा गुन्हा नाही, असंही अग्रलेखात म्हटलंय.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments