R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कोल्हापूर विमानताळवरुन मालवाहतुक सुरू होणार; पालकमंत्री सतेज पाटील आग्रही !

कोल्हापूर विमानताळवरुन मालवाहतुक सुरू होणार; पालकमंत्री सतेज पाटील आग्रही !

 

कोल्हापूर | काेल्हापूर येथून प्रवासी विमानसेवेतून मालवाहतूकची कार्गो सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा काेल्हापूरसह सातारा, सांगलीसह काेकणातील नागरिकांना हाेईल. त्यादृष्टीने विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी काेल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली होती. त्यास ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काेल्हापूर विमानतळाच्या टर्मिनस इमारतीचे बांधकाम मंद गतीने सुरू आहे. त्या कामाचा वेग वाढविण्याची गरज असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी मागणी करुन येथील विमानतळावरून सध्या केवळ प्रवासी विमानसेवा सुरू आहे. या प्रवासी विमानसेवेमुळे नागरिक हैदराबाद, मुंबई, बंगळूर, अहमदाबाद, तिरुपती येथे ये-जा करु लागले आहे.

मात्र जर विमानसेवेतून मालवाहतूक झाल्यास त्याचा उद्याेजकांना फायदा हाेईल असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान मंत्री पाटील यांनी नुकतीच विमानतळ प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांशी देखील याबाबत चर्चा केली आहे. आगामी काळात मालवाहतुक (कार्गो) सेवेसाठी पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर ही सेवा सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments