R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी पेंग्विनवर कोट्यावधींची उधळपट्टी?

कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी पेंग्विनवर कोट्यावधींची उधळपट्टी?

 

मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा पेंग्विनच्या मुद्द्यावरून सत्तेत असलेल्या सेनेला डिवचले आहे. मुंबईतील राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनची देखभाल करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने १५ कोटींचे टेंडर ३ वर्षांच्या कालावधीसाठी काढलं आहे. या टेंडरवरुन विरोधकांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

पेंग्विनच्या खर्चासाठी अव्वाच्या सव्वा खर्च कशासाठी असा प्रश्न भाजपकडून करण्यात आला आहे. कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी पेंग्विनवर कोट्यावधींची उधळपट्टी होतेय असा सवाल आता आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना केला आहे. वाघांची देखभाल महानगरपालिका कर्मचारी करु शकतात तर पेंग्विनसाठी १५ कोटींचा ठेका कुणासाठी? असा प्रश्न नितेश राणेंनी केला आहे.

आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून पेंग्विनसाठी १५ कोटींचा ठेका कुणासाठी? असा प्रश्न केला आहे. नितेश राणे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. ही सन्‍मानाची बाब असली पाहिजे. पण आपण घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्या पद्धतीने आपण मुंबईकरांची दिशाभूल केली आहे. हे अत्यंत निंदनीय आहे.

पुढे राणे पत्रात म्हणतात की, आम्हीही समजू शकतो की ‘पेंग्विन’च्या दबावामुळे आपण खोट्याला खरं सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. महापालिकेने प्रकाशीत केलेल्या आकडेवारीप्रमाणे पर्यटकांची संख्या २०१७ ते २०१९८ या आर्थिक वर्षात १७ हजार ५७ हजार ०५९ होती पण मागील दोन वर्षामध्ये पर्यटकांचा आकडा कमी झाला, आता ती संख्या १० लाख ६६ हजार ०३६ वर आलीय. त्यामुळे तीन वर्षात सात लाख पर्यटकांची संख्या घटली असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

 

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

निवडणूकीला जो बायडन घेऊन या; संजय राऊतांचा भाजपला टोला

  दादरा नगर हवेलीत होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कंबर कसली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. या पोट निवडणुकीच्या निमित्ताने अनेक...

“प्रशांत किशोरांनी पक्षात प्रवेश करावा मग ज्ञान पाजळावे” काँग्रेसच्या या नेत्याचा सल्ला

  नवी दिल्ली | राजकारणातील चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर सध्या चांगलेच चर्चेत आलेले दिसून येत आहे. किशोर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत अद्याप काही माहिती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments